Drink limited water and stay healthy

Drink limited water and stay healthy

योग्य प्रमाणात पाणी प्या, निरोगी रहा –

पृथिव्याम् त्रीणि रत्नानि जलमन्नम् सुभाषितम् |
मूढै: पाषाणखण्डेषु रत्न-सङ्ज्ञा प्रदीयते ||
जगात जल, अन्न व सुभाषित (चांगले विचार) हीच तीन रत्ने आहेत. पण काही मूर्ख लोक दगडांच्या तुकड्यांना रत्ने समजतात.
There are three jewels on earth: water, food, and adages. Fools, however, regard pieces of rocks as jewels.
आयुर्वेदात “जलं आश्वासनं श्रेष्ठम् ।।” असे सांगितले आहे. पण सध्या परिस्थिती अशी आहे की सर्वांना जल मिळेल कि नाही याचीच शाश्वती राहिलेली नाही.
योग्य प्रमाणात पाणी प्या, निरोगी रहा –
▪अतिप्रमाणात पाणी पिणे चुकीचे आहे.
▪अतिथंड पाणी पिऊ नये, शक्यतो कोमट पाणी प्यावे.
▪कफज विकार, खोकला, सर्दी यासारख्या आजारात पाण्याचे प्रमाण मर्यादित हवे, अन्यथा औषधे घेऊन उपयोग होत नाही.
▪जास्त प्रमाणात फळे खाल्ल्यानेही, त्यातील अतिरिक्त पाण्याने व त्यातून अनावश्यक कफ व त्याद्वारे आजार वाढतो.
▪ऋतूनुसार फळे खावीत पण प्रमाणात.गरज नसताना फळाचे ज्यूस करून पिण्यापेक्षा फळे चावून खावीत.
▪पण कफज विकार असताना प्रमाण आणखी कमी करावे.
▪जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे टाळावे.
सुभाषितात सांगितल्याप्रमाणे पाण्याचा रत्नासारखा वापर केला पाहिजे.
योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करा, स्वतःला व पृथ्वीला निरोगी ठेवा.
Drink limited water and stay healthy