Benefits of Surya Namaskar

आज जागतिक सूर्यनमस्कार दिन

भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.

सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.

सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात.

सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे

१. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.
२. हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.
३. बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.
४. पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.
५. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.
६. पचनक्रिया सुधारते.
७. मनाची एकाग्रता वाढते, आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो.

Surya Namaskar or Sun Salutation is a sequence of 12 powerful yoga poses. Besides being a great cardiovascular workout, Surya Namaskar is also known to have an immensely positive impact on the body and mind.

Surya Namaskar is best done early morning on an empty stomach. Each round of Sun Salutation consists of two sets, and each set is composed of 12 yoga poses. You might find several versions on how to practice Sun Salutation. However, it is advisable to stick to one particular version and practice it regularly for best results. Besides good health, Surya Namaskar also provides an opportunity to express gratitude to the sun for sustaining life on this planet.

Benefits of Surya Namaskar:
1. Helps maintain cardiovascular health
2. Stimulates the nervous system
3. Helps in stretching, flexing and toning the muscles
4. Excellent exercise for weight loss management
5. Strengthens the immune system
6. Enhances cognitive functions
7. Improves overall health, strengthens the body and relaxes the mind.