Benefits of Sesame Oil

तैलं स्वयोनिवत् तत्र तीक्ष्णं व्यवायि च |
त्वग्दोषकृत् अचक्षुष्यं सूक्ष्मोष्णं कफकृन्न च ||
कृशानां बृंहणायालं स्थूलानां कर्शनाय च |
बद्धविट्कं कृमिघ्नं च संस्कारात् सर्वरोगजित् ||
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 55, 56

तिळाच्या तेलाचे गुणधर्म व फायदे

तेलाचे गुण, ज्यापासून ते निघते त्या त्या पदार्थांप्रमाणे असतात. तिळाचे तेल तीक्ष्ण, व्यवायि (थोड्याच वेळात सर्व शरीर व्यापणारे), त्वचेचे विकार करणारे (खाण्यासंबंधी), नेत्रांना वाईट, उष्ण व सूक्ष्म म्हणजे त्वचेत लवकर जिरणारे असून कफ उत्पन्न करीत नाही.
ते कृशाना पुष्ट करिते व स्थूलांना कृश करिते. ते मलावरोधक असून कृमिघ्न आहे व निरनिराळ्या औषधींनी सिद्ध केले असता सर्व विकारांवर उपयोगी पडते.

Benefits of Sesame Oil

Oils are generally similar to their source (seed). Sesame oil cleanses and detoxifies skin, not good for eyes, pierces into deep tissues, hot, balances Kapha.
Useful for both obese and emaciated people. Responsible for constipation, Useful in worm infestation. When it is processed with other herbs, it is very beneficial in various diseases.